यावल राजमुद्रा | जिल्ह्मातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील एका जिनिंग व्यापाऱ्याची कार अडवून एका कारमधून आलेल्या तीन दरोडेखोरांनी सुमारे दिड कोटी रुपयांची रोकड लुट करीत पसार झाले होते यातील एका संशयीत आरोपीला लुटीच्या काही रक्कमेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई करीत अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या दरोड्यातील सहभागी असलेल्या विदगाव ता. जि. जळगाव येथील राहणाऱ्या एका संशयित आरोपीने काही रक्कम यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील आपल्या नातेवाईकाकडे ठेवली होती ही रक्कम जळगाव स्थानिक गुन्हे पोलीस शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी डांभुर्णी येथून जप्त केली आहे.
पोलीसांनी ही कारवाई अत्यंत गोपनियता बाळगत केली मात्र मोठ्या संख्येने आलेले पोलीस पथक व कारवाई पाहून डांभुर्णी ग्रामस्थ चकीत झाले. जप्त केलेली रक्कम सुमारे ४८ लाखापर्यंत असून ही रक्कम त्या दरोड्यातील असल्याची तालुक्यात चर्चा आहे.
धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाराची गाडी अडवून व्यापाऱ्या कडील दीड कोटींची रक्कम तीन अज्ञात दरोडेखोरांनी शनिवारी लंपास करत जळगावच्या दिशेने पसार झाले होते. यातील एक संशयित विदगाव ता. जळगाव येथील पिंटू कोळी असल्याचे समजते व तो पोलीसांचे ताब्यात आहे. पिंटूने या दरोड्यातील सुमारे ४८ लाखाची रक्कम त्याचा साळू तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवासी योगेश कोळी याचे गोठ्यात ठेवली असल्याची माहीती पोलीसांना मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केलेल्या डांभुर्णी येथे केलेल्या मोठया कारवाईत जप्त केली आहे. या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईच्या घटनेमुळे यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.