स्थानिक गुन्हे शाखे कडुन मुद्देमाल सह अटक
जळगांव राजमुद्रा | जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमाचार शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले असता नामे किशोर रामदास कोळी (वय – ३०) व्यवसाय बिगारी रा. कांचन नगर ता. जि. जळगाव येथे वास्तव्यास आहे.
त्याच्या जवळ असलेले मोटारसायकलच्या शिट खाली अंदाजे १,३१,००० रु कींमतीचे एकुण ०३ गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगझीन सह व एकुण ०४ जिवत काडतुस तसेच ताब्यातील मोटारसायकील पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहे.
किशोर रामदास कोळी अटक करण्यात आली असून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सपोनी मोरे हे करीत आहे.
सदर ची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, श्री. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी मा.श्री संदिप गावीत, पोनी नजन पाटील, सपोनी अमोल मारे, पोउनि गणेश वाघमारे पोउनि. गणेश चौभे, विजयसिग पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, कीरण चोधरी, सुधाकर आभोरे, प्रितम पाटील इश्वर पाटील म.पोप्रियंका कोळी, सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगीरी केली आहे.