जळगांव राजमुद्रा | तालुक्यातील वावडदा ता. जि. जळगाव गावातील मारुती मंदीराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरुन अज्ञात असलेल्या इसमाने सेंट्रींग बांधकामाचे साहित्य चोरुन नेले होते. त्यानुसार पोलीस पाटील वावडदा विनोद तुळशिराम गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ईसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हा सहभागी असलेल्या संशयितांबाबत एम.आय.डी.सी. पोलीसानी गोपनीय माहीती वरुन वावडदा गावातील संशयीत १) सागर विनोद चव्हाण वय – ३२ वर्ष २) विनोद रमेश गोपाळ वय-२५वर्ष, दोन्ही रा वावडदा ता.जि. जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या जवळील गुन्हयातील बांधकामाचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.
२१/०२/२०२४ रोजी रात्रीचे वेळी जळगाव शहरातील पुरुषोत्तम नगर शिरसोली नाका येथे अजय ओमप्रकाश जोशी यांचे चालु असलेल्या बांधकामाचे साईटवरुन कोणीतरी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची चोरी ही शेख फैजल शेख शमसोद्दीन ( वय ३६ वर्ष) रा. फुकटपुरा तांबापुरा याने केल्याबाबतची माहिती पोलीसना मिळाली होती त्या प्रमाणे ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, श्री. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप गावीत, यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डीसी. पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी बबन आव्हाड पो. उपनिरी. दत्तात्रय पोटे दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी पो.ना. सुधीर साळवे, पोना सचिन पाटील पोना किशोर पाटील नाकॉ राहुल रगडे विशाल कोळी, पोकॉ ललीत नारखेडे मापोकों राजश्री बावीस्कर यांनी पुढील कारवाई कामी जामनेर पोस्टे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.