चाळीसगाव (प्रतिनिधी)- दि. 25 .02 .2013 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास शिरसगाव , तलोंदा येथून शेतातील विहिरीतून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर चोरी करून ओमनी गाडीत टाकून फरार झाले होते त्याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व लागलीच आरोपीताचे शोध कामी मा. अप्पर पोलीस अधीक्षक , नेरकर मॅडम चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय अधिकारी श्री अभयसिंग देशमुख चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप परदेशी यांचे सोबत पोलिस हवालदार अशोक राठोड,जितु परदेशी , गोरख चकोर, निलेश लोहार, राकेश काळे असे पथक आरोपी शोधकामी रवाना झाले असता गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे भोरटेक कजगाव या ठिकाणी शिवारात असल्याचे समजले सदर ठिकाणी शोध घेतला असता दोन संशइत मिळून आले त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशी दरम्यान सांगितले की शिरसगाव, तलोंदा येथील विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर आम्हीच चोरून आणल्याचे कबूल केले त्यांचे ताब्यातून चार इलेक्ट्रिक मोटर हस्तगत करण्यात आलेल्या आहेत गुन्हा कबूल केलेल्या आरोपिंपैकी गणेश उर्फ शुभम राजेंद्र महाजन रा. कजगाव ता. भडगाव जि. जळगाव सोबत एक विधी संघरशित बालक याला जेरबंद केले असून चेतन साहेबराव शितोळे रा. भोरटेक ता. भडगाव जि.जळगाव हा फरार असून त्याचा शोध घेणे चालू आहे सदर गुण्याचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश रमेश मांडोळे हे करीत आहे