जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महानगरपालिकेतील काही कर्मचारी ३० जून २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महापौर यांच्या दालनात आयोजित या कार्यक्रमात आयुक्त सतीश कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार उपस्थित होते. यावेळी कपिल पवार यांच्या हस्ते रोपट्यांसह कुंडी, शाल व रुमाल घेऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये सुनील आनंदराव धुमाळ सहाय्यक ग्रंथपाल, भिकन विष्णू पेंढारकर वाहन चालक, योगेश शिवराज पाटील लिपिक नगरसचिव विभाग, विजय संभाजीराव देशमुख लिपिक, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दिलीप प्रभाकर पाटील, मजूर दिनकर रामकृष्ण पाटील, शिपाई यांचा समावेश आहे. याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन संकत, नगरसेविका काळे यांचे पती कुंदन काळे तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.