राजमुद्रा वृत्तसेवा । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य जनता हैराण असताना. आता सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी जनतेला आणखी एक धक्का दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
घरगुती गॅस सिलेंडर तब्ब्ल २५.५० रुपयांनी महागले तर कमर्शियल सिलेंडर ८४ रुपायांनीं महागले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर च्या दरात मोठे बदल करण्यात आले. देशातील विविध शहरात १ जुलै पासून नव्या किमती लागू झाल्या आहे.