मुंबई (राजमुद्रा) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक वृत्तवाहिनी वर कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. “मनोज जरांगे यांचं उद्दिष्ट काय होतं? मराठा समाजाला आरक्षण देणं. आम्ही राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला. चार लाख घरात जाऊन सर्वेक्षण केलं आणि 10 टक्के आरक्षण दिलं. पण हे असेच दिलं पाहिजे, तसंच दिले पाहिजे याला अर्थ नाही. या गोष्टीचं राजकारण होतंय. जरांगे जेव्हा उपोषण करत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सद्हेतूने त्यांना रिस्पॉन्स दिला. आम्हीही रिस्पॉन्स दिला. पण ते आता जे बोलत आहेत, त्यावरून उद्धव ठाकरेंचा गट बोलत आहे की शरद पवार यांचा. कुणाची वाक्य बोलत होते. याबाबत शंका होती. कुणाची स्क्रिप्ट वाचत होते. आज आम्ही पोलीसमध्ये भरती काढली. त्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. पण तरीही त्यात वेगवेगळ्या गोष्टी काढल्या जात आहेत. पण यातून मुलांना संभ्रमित केलं जातं. आंदोलन होतं. त्यांच्यावर केसेस होतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जरांगे पूर्वी काय बोलत होते आणि आता काय बोलले हे पाहिलं तर ही वाक्य आहेत जे आमचे विरोधक आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या भाषेत बोलत आहेत. त्यामुळे स्क्रिप्ट कुणाची आहे. मागे कोण आहे हे बघावं लागेल. जरांगेंना दोष देण्यात फायदा काय? मागे कोण आहे हे पाहिलं पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
जरांगेंच्या आंदोलनस्थळी का गेलो नाही?
“मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचं कारण नव्हतं. त्या ठिकाणची भावना होती. ती पाहता मी गेल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील असं वाटत होतं. लाठीचार्ज पोलिसांनी केला असला तरी होम डिपार्टमेंट माझ्याकडे येतो. त्यामुळे मी गेलो नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी मुख्यमंत्र्यासोबत करत होतो. अंतरवलीतील दगडफेकीत पोलिसांवरह दगडफेक झाली. पोलीसही मराठे होते. महिला पोलीसही जखमी झाल्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनीच सर्व गोष्टी हँडल करायचे असतात. आम्ही त्यांना मदत करायची असते. माझा जो पूर्वीचा अनुभव होता, त्याबाबतची मदत मी त्यांना केली आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो. त्यांनी घेतला”, असं फडणवीस म्हणाले.