जळगाव (राजमुद्रा)-दि. 29/02/2024 रोजी चे रात्री जे के पार्क मेहरुण बगीचा येथे काही ईसम हे गावठी पिस्टल घेवुन फिरत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोस्टे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी तीन ईसम हे मोटार सायकलवर उभे दिसले होते ते पोलीसांना पाहुण पळुन जात असतांना , दिपक लक्ष्मण तरटे वय 26 वर्ष रा.नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा वय 21 वर्ष रा सुप्रीम कॉलनी जळगाव अशांना ताब्यात घेतले होते. व सदर ठिकाणाहुन विशाल राजु अहीरे हा पळुन गेला होता. पकडलेल्या ईसमांची अंगझडती घेतली असता दोघांकडे प्रत्येकि एक एक असे दोन गावठी बनाटीचे कट्टे मिळुन आले होते. तसेच बजाज पल्सर मो सा क्र.एमएच 19 डीयु 4565 अशी मिळुन आली होती एकुण 128,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल गावठी कट्टयासह मिळुन आला आहे. सदर चे गावठी कट्टे मिळुन आल्यामुळे पोका. किरण प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक 28/02/2024 रोजी केलेल्या कारवाई मधे अरशद शेख हमीद उर्फ अण्णा रा गेंदालाल मिल जळगाव याच्याकडे अजिंठा चौफुली जळगाव येथे गावठी कट्टा मिळुन आला होता. याप्रमाणे दोन कारवाया करण्यात आलेल्या आहे.
आज रोजी 01) दिपक लक्ष्मण तरटे वय 26 वर्ष रा नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, 02) अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा वय 21 वर्ष रा सुप्रीम कॉलनी जळगाव यांना अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती सीम एम देशमुख यांनी त्यांना ०४- दिवसांची पोलीस कस्टडी रीमांड दिली असुन सरकारतर्फ अडव्होकेट श्रीमती स्वाती निकम यांनी कामकाज पाहीले. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्री अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री संदीप गावीत सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड पोउनी दिपक जगदाळे, पोउनी दत्तात्रय पोटे, सफौ. अतुल वंजारी, पोहेका. सचीन मुंढे, पोहेका गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोना. किशोर पाटील, पोना. सचीन पाटील, पोना. योगेश बारी, सुधीर सावळे, पोका. किरण पाटील, पोका. छगन तायडे, पोका. ललीत नारखेडे, राहुल रगडे यांनी केली आहे. सदर अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी एकुण 18 गुन्हे दाखल आहे तसेच दिपक लक्ष्मण तरटे याच्यावर 04 गुन्हे दाखल आहे.