एरंडोल राजमुद्रा वृत्तसेवा । ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी माळी समाजातर्फे तहसीलदार अर्चना खेत माळीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे जि . प ग्रामपंचायत, न.पा, मनपा व इतर संस्थेतले असलेले आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तरी केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समाजाचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे असे म्हटले आहे.
दरम्यान माळी समाजाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी माजी नागराध्यक्ष देविदास महाजन, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, रवींद्र महाजन, दुर्गादास महाजन, माजी तहसीलदार अरुण माळी , पंकज महाजन, उमेश महाजन, अतुल महाजन, नगरसेवक कुणाल माहाजन, वकील आकाश महाजन, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.