जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । सावखेडा बु. ग्रामपंचायती मध्ये अपहार झाला असून, याप्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात पडली असून शासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रा.प सदस्य मंगेश यशवंत पानपाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात मंगेश पानपाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार अर्ज दिला असून , त्यात म्हटले आहे, सावखेडा बु. ग्रा.प मध्ये सन २०१५ – २०२० या वर्षात शासनाकडून आलेल्या निधीत तत्कालीन सदस्यांना गावात विकास कामे झाल्याचा कागदोपत्री बनाव केला आहे. प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता निकृष्ट दर्जाचे रस्ते व स्वच्छतागृहे आणि घरकुल बांधण्यात आले आहे. तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत देखील अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावाच्या विकासासाठी आतापर्यंत किती निधी वापरण्यात आला हे तापून पाहण्याचा विषय आहे. तत्कालीन सदस्यांनी निधीचा दुरुपयोग करून सर्व सामान्य जनतेला लुटले आहे. या प्रकरणाची सखोल काचौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.