जळगाव (राजमुद्रा,).
6 March 2024 : रेल्वे स्थानकावर प्रवाशांना त्यांचा हलगर्जीपणा, अतिघाईचा फटका बसतो. दोन दिवसांपूर्वीच जळगाव रेल्वे स्थानकावर एका तरुणाला दोन पाय गमवावे लागले. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. तर तर एका रेल्वेतून आउटर साईडने उतरल्यानंतर दुसऱ्या बाजूने रेल्वे आल्याने त्या कुटुंबाचा एकदमच गोंधळ उडाला. हे कुटुंब दोन धावत्या रेल्वेंच्या मधात अडकले. यावेळी बघ्यांचा पण काळजाचा ठोका चुकला. पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही इजा झाली नाही.जळगांव रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबल्यानंतर आऊटर साईडने दोन लहान मुलांसह काही प्रवासी उतरले. रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर शॉर्टकट जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
ही घटना अगदी काही क्षणातच घडली. पण मुलांना वाचविण्याच्या हेतूने आई-वडिलांनी मुलांना ज्या रेल्वेतून उतरले. त्यात पुन्हा चढवले आणि दोन महिला आणि इतर प्रवाशी तिथेच खाली बसले. या सर्व प्रकारामुळे मुले भांबवली. तर प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलातील जवान धावून आले. त्यांनी या प्रकाराबद्दल प्रवाशांवर आरडाओरड करत संताप व्यक्त केला.
रेल्वेने रुळ क्रॉस करण्याचा प्रयत्न केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. याच दरम्यान रेल्वे स्थानकावरील वीज सुद्धा काही काळासाठी बंद झाल्यामुळे गोंधळ वाढला. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. दोन्ही गाड्या गेल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. तसेच त्यांचे साहित्य सुद्धा प्लॅटफॉर्मवर LLPट वापरतात मात्र शॉर्टकट त्यांच्या जीवावर भेटू शकतो त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून रेल्वे रूळ पार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.