चाळीसगाव (राजमुद्रा)- तालुक्यातील खासदारांचे गाव म्हणुन ओळख असलेल्या दरेगांव सहीत पाच गावांचे स्थानिक लोकप्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.
चाळीसगाव तालुक्याती लोंधे,कृष्णापुरी, दरेगाव , सुंदरनगर, या पाच गावातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून या पाणीपुरवठा योजनेची कामे देखील 90% टक्के कामे ही पूर्ण झाली असून किरकोळ कामे ही बाकी आहेत सदर कामांच्या बाबतीत वरील गावांतील सरपंच यांनी ठेकेदार यांना कामासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की वरखेडे गावातील काही ठराविक व्यक्ती हे काम करू देत नाही यावर संबंधीत गावातील सरपंच यांनी संबंधीत विभागाकडे या बाबत तक्रार केली परंतु तरी देखील कामे सुरु झालेली नाहीत या वर्षी चाळीसगाव तालुक्यात अतिदुष्काळ असल्यामुळे या सदरच्या गांवाना 12 ते 13 दिवसांनंतर पाणी मिळत आहे त्यामुळे पाण्याची भिषण परिस्थिती ही निर्माण होईल पूर्णत्वास आलेल्या योजनांना काम तात्काळ सुरू करावे अन्यथा या गावांच्या पाणी पुरवठा योजनेचे कामे दि 5 मार्च पर्यन्त सुरु न केल्यास दि.6 मार्च रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदने देखील दि .23 फेबुवारी रोजी संबंधीत प्रशासनाला दिले होते तरी देखील या योजनेचे काम सुरू झाले नसल्याने दि.6 मार्च रोजी लोधे, कृष्णापुरी, दरेगाव, चिंचगव्हाण, सुंदरनगर या गावातील सरपंच सर्व पाचही गावांतील नागरिक महिला सह चाळीसगाव तहसिल कार्यालय समोर उपोषणाला बसले आहेत .
या उपोषणाच्या पहिल्या दिवशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता ए .बी .चव्हाण ,नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी उपोषस्थळी जाऊन चर्चा केली यावेळी खासदार उन्मेश पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील हे ही उपस्थित होते मात्र आज तरी ठोस मार्ग निघाला नसल्याने आमरण उपोषण सुरूच आहे या उपोषणासाठी दरेगाव चे सरपंच गिरीष पाटील, कृष्णापुरी ग्रामपंचायत सदस्य प्रविण राठोड, लोधेंचे माजी उपसभापती हिरामन सोनवणे, चिंचगव्हान उपसरपंच सत्यजीत निकम , सुंदरनगर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ राठोड यांच्या सह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत