जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जि .प च्या मालकीचे १८ गाळे जि.प चे सी.ई.ओ डॉ. बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले. या प्रसंगी सी ई ओ कमलाकर रणदिवे, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नंदू पवार, उप अभियंता सतीश सिसोदिया जळगावचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, कायदेशीर सल्लागार वकील अरुण देवरे उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तात गाळे खाली करून ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.
२००३ पासून जि.प मालकीचे १८ गाळे अनधिकृतपणे गाळेधारकांनी ताब्यात ठेवले होते. या गाळ्यांचे जि.प ला भाडे देत नव्हते व गाळेधारक मालकी सोडत नव्हते. याबाबत त्यांना सूचना देऊनही गाळेधारक दाद देत नसल्याने नोटीस पाठवण्यात आली असून यासंदर्भात जि.प ने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याबाबत दिला होता. त्यामुळे आज सकाळी ११ कारवाई करण्यात आली.