चाळीसगाव (राजमुद्रा)- सध्या मेहुनबारे ,चाळीसगाव शहर ,चाळीसगाव ग्रामीण, व इतर भागात मोटरसायकल चोरीचे प्रमाणात जास्त चालू असून मेहुनबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशइत इसम नामे प्रताप सिंग दौलत सिंग गिरासे राहणार सबगव्हाण तालुका पारोळा जिल्हा जळगाव हा ईकडील परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करून त्याचे गावाकड विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली म्हणून सदर घडत असलेला प्रकार संदीप परदेशी यांनी मा. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्री अभयसिंग देशमुख यांना कळविली त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी मेहुनबारे पोलीस स्टेशन कडील मिलिंद शिंदे ,गोरख चकोर, निलेश लोहार ,भूषण बाविस्कर ,सुदर्शन घुले ,व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडील शरद पाटील व नंदू महाजन असे पथक तयार करून रवाना केले होते सदर पथकाने संशइत आरोपी याचे गावी जाऊन गोपनीय माहिती घेतल्यावर सदर इसम हा त्याचे म्हशीचां गोठ्या मध्ये लपलेला आहे बाबत माहिती मिळाल्याने सदर पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन संशइत इसमास ताब्यात घेऊन मेहूनबारे पोलिस स्टेशन ला आणून कसून चौकशी केली असता संशइत इसम नामे प्रतापसिंग दवलतसिंग गीरासे वय 31 रा सबगव्हाण ता पारोळा जिल्हा जळगाव असे सांगितले व त्याने नाशिक ,धुळे, व 40 गाव येथून एकूण पाच मोटर सायकल चोरल्या बाबत सांगितले त्याने सांगितलेल्या सर्व मोटर सायकल गाड्या त्याचे गावी जाऊन त्याने काढून दिलेल्या ताब्यात घेऊन मेहूनबारे पोलिस स्टेशन ला जमा केल्या आहे सदर आरोपी ची कसून चौकशी केली असता त्याने चौकशी दरम्यान चाळीसगांव शहरात देखील बस स्टँड परिसरात पल्सर चोरी केल्याची कबुली दिल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अभिलेख तपासला असता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे 258/23 भा द वी 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपी व जप्त करण्यात आलेल्या गाड्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने 40 गाव शहर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत
सदर आरोपी याचे ताब्यातून अजून खूप गाड्या मिळण्याची शक्यता आहे