चाळीसगाव/चोपडा (राजमुद्रा) – चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हददीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे रोड, तेजस कोणार्ककडे जाणारे रोडवर नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाचंदी दरम्यान धुळयाकडुन मोटार सायकल क्रं. MH १२ VX ३००८ हिचेवरुन चाळीसगावचे दिशेने दोन इसम येत होते. नाकाबंदी सुरु असलेली पाहून गाडी चालविणा-या इसमाने काही अतंरावर मोटार सायकल थांबविली. तेव्हा पाठीमागे बसलेला इसम गाडीवरुन उतरुन धुळे रोडच्या आजुबाजूचे रहिवाशी परीसरात पळून गेला. त्यामुळे पोलीस स्टाफने पळत जावुन मोटार सायकल चालवित असलेल्या इसमास दिनांक 10 रोजी मोटार सायकलीसह ताब्यात घेतले.
त्यास त्याचे व पळून गेलेल्या इसमाचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आमीर आसीर खान, वय २०, रा. काकडे वस्ती, कोढंवा, पुणे व त्याचे सोबत असलेल्या इसमाचे नाव आदित्य भोईनल्लू, रा.पुणे असे सांगितले. त्यानंतर ताब्यात घेतलेला आमीर आसीर खान याचेकडील रॉक (बॅग) तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचे ४ पिस्टल, ५ मॅगझ ीिन व १० जिवंत काडतुस, एक मोटार सायकल असा एकुण २,०१,०००/- रु. किंमतीचा शस्त्रसाठा व मुददेमाल मिळून आला आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.क्रं. ११०/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३/२५, भादवि कलम ३४ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लघंन १३५ प्रमाणे पोकॉ ३३६३ पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेडडी सो. जळगांव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर सो चाळीसगांव परीमंडळ, मा. सहा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अभयसिंह देशमुख सो. चाळीसगांव उपविभाग, भा.पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील सो. चाळीसगांव शहर पो.स्टे., यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.सागर एस. ढिकले पोउपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, श्री.योगेश माळी, पोहेकॉ १७२० राहुल सोनवणे, पोना ३१३६ महेंद्र पाटील, पोकों ३३६३ पवन पाटील, पोकों १८०८ मनोज चव्हाण, पोकॉ २०८ आशुतोष सोनवणे, पोकों २५४५ रविंद्र वच्छे, पोकों ९८८ ज्ञानेश्वर गीते, पोकों ५५२ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों १६२२ नंदकिशोर महाजन, पोकों ४४७ समाधान पाटील या पथकाने सदरची कारवाई केली असुन पुढील तपास पोउपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, पोकों ४३५ प्रकाश पाटील, पोकों १७४१ उज्वलकमार म्हस्के हे करीत आहेत.
तर दुसरीकडे दि.१०/०३/२०२४ रोजी पारउमर्टी येथील दोन इसम हे अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असुन सदरचा सौदा हा कृष्णापुर ता. चोपडा शिवारात उमर्टी रोडवरील घाटात होणार असलेबाबत माहीती मिळाली होती. त्याप्रमाणे कृष्णापुर ते उमर्टी जाणारा डोंगराळ भागातील कच्चा रस्त्यावरील घाटातील मंदीरापासुन थोडे पुढे उमर्टी गावाकडेस चढती जवळ सदर दोन मोटार सायकलींवरील ४ इसमांकडे काहीतरी संशयीत गोणीमध्ये असल्याचे संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकून त्यांना जागीच पकडले असता त्यांचे नाव गाव विचारता त्यांचे नाव १) हरजनसिंग प्रकाशसिंग चावला वय २० वर्ष, रा. पारउमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, (म.प्र) असे सांगीतले २) मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला वय २० वर्षे, रा. पारउमर्टी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), ३) अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेट हरिविठ्ठल नगर, जळगांव ता. जि. जळगांव ४) अर्जुन तिलकराज मलीक वय २५ वर्षे, रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेता त्यांचे कडील गोणीमध्ये ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व २ रिकाम्या मॅग्झिन असा मुद्देमाल मिळून आला. त्यांचे जवळील सदर गोणी ताब्यात घेत असतांना सदर चारही इसमांनी पोलीसांचे तावडीतुन सुटुन पळुन जाण्यासाठी हुज्जत घालून पोलीस कर्मचान्यांशी हातापायी करुन शिवीगाळ व धक्का बुक्की केली. त्यावेळी त्यांचे ताब्यातील २ मोटार सायकलली १) क्र.एम एच १९ ई एफ ३७९३, २) एम पी ६९ एम ए १८४८ व ४ मोबाईल हॅण्डसेट असे मिळून आले. असा एकुण ४,०७,४००/- रु किं ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, व २ रिकाम्या मँग्झिन, ४ मोबाईल हॅण्डसेट व २ मोटार सायकलीसह मिळून आला आहे. सदरचे गावठी कट्टे मिळून आल्याने पोहेकॉ / ३०९४ शशीकांत हिरालाल पारधी नेम चोपडा ग्रामीण पो स्टे यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन CCTNS गु.र.नं.३९ / २०२४ भा.द.वि. कलम ३५३, ५०४, ३२३, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५, ७/२५, म.पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
दि. १०/ ०३ / २०२४ रोजी आरोपी १) हरजनसिंग प्रकाशसिंग चावला वय २० वर्ष, रा. पारउमटी, ता. वरला, जि. बडवाणी, (म.प्र) असे सांगीतले २) मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला वय २० वर्षे, रा. पारउमर्टी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), ३) अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर, जळगांव ता. जि. जळगांव ४) अर्जुन तिलकराज मलीक वय २५ वर्षे, रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सो जळगांव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर सो चाळीसगांव परिमंडळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री कुणाल सोनवणे चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पो.नि. कावेरी कमलाकर, पोहेकॉ / ३०९४ शशीकांत पारधी, पोहेकॉ / ९४९ किरण पाटील, पोकों/ ७९७ गजानन पाटील, पोका / १८९९ संदिप निळे, होमगार्ड / २७७७ थावऱ्या बारेला, होमगार्ड / २२११ सुनिल धनगर, होमगार्ड / ३९८ श्रावण तेली, होम/ १८५४ संदिप सोनवणे सर्व नेमणुक चोपडा ग्रामीण पो.स्टे.यांनी केली आहे. तसेच अलबास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे रा. महादेव चौक बाजार पेट हरिविठ्ठल नगर जळगांव ता. जि. जळगांव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात एकुण ९ ते १० गुन्हे दाखल आहेत.