रावेर राजमुद्रा (जयंत भागवत) । तालुक्यातील पाल येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यातही लसीकरण कक्ष आणि सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. पालसह आदिवासी बहुल भागातील गावात देखील त्यांनी पाहणी केली. यानंतर ग्रामीण रुग्णालयात त्यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली. मुख्य अधिपरिचारिका कल्पना नगरे यांनी लसीकरणाबाबत माहिती दिली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी बी बारेला यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आदिवासी भागात याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अश्या वेळी सर्वांनी सावध असणे आवश्यक आहे. म्हणून ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईन साठी खाजगी दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन केले. यावेळी जि.प चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एन बी पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील , डॉ. सचिन पाटील, डॉ. मिलिंद जावळे. आदी उपस्थित होते.