जळगांव (BBN-24)- दिनांक- 10/03/2024 रोजी रात्री 10:45 ते 11:00 वाजेच्या दरम्यान नामे अक्षय विलास शेलार, रा-गाते ता. रावेर ह.मु. निमखेडी रोड, अशोक बेकरी जवळ जळगांव हे त्यांचे मित्राचा अपघात झाल्याने त्यांनापाहण्यासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे जात असतांना जळगांव शहरातील अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटल, जवळील मोहीत चायनीज जवळून त्याचे जवळील मोपेड मो.सा. ने जात असतांना त्यास एक काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली पॅशन प्रो मो.सा. वर आलेले दोन पुरुष व एक महीला अश्यांनी येवून फिर्यादी यास थांबवून तुला काही मदत हवी का असे विचारले, त्या वेळी सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे म्हणाले कि, मला काही मदत नको, असे बोलू लागले त्या नंतर त्यांनी फिर्यादी जवळ येवून 200/-रुपयेची मागणी केली, परंतू त्यांचे जवळ पैशे नसल्याने मो.सा. वर बसलेल्या महीलेने फिर्यादी यास चापट्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. व काही कळण्याचेआत त्याचे हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून अग्रवाल चौका कडे त्यांची मो.सा. वर पळुन गेल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन CCTNS भाग 5 गुरन-0088/2024 भा.द.वि.कलम – 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात गुन्हे शोधपथकातील पो.ना. 3087. जुबेर तडवी, पो. कॉ. 3257. अमितकुमार मराठे, अश्यांना गुप्त बातमी मिळाल्याने, त्यांनी सदर हकीकत ही मा. पोलीस निरीक्षक श्री. राकेश मानगांवकर, यांना कळवून त्यांनी गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ.2534.सलीम तडवी, पो. कॉ. 2323. मिलींद सोनवणे, पो. कॉ. 2093. तुषार पाटील, म.पो. कॉ. 368. वैशालीसादरे, चा.पो.हे.कॉ.2587. साहेबराव खैरनार, अश्यांचे पथक तयार करुन मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारेआरोपीचा शोध घ्या व योग्य ती कार्यवाही करा असे आदेश केल्याने वरील पथकाने 1) शेख अजरुद्दीन शेखहुस्नोद्दीन ऊर्फ भुतपलीत वय-32 रा. शाहुनगर प्रिप्राळा रोड, जळगांव 2) मंगल सोमा सोनवणे वय – 28 रा-प्रिंप्राळा हुडको, साईबाबा मंदीर जवळ, जळगांव यांना पिंप्राळा हुडको परिसरातुन दि. 11/03/2024 रोजी ताब्यात घेवून अटक केली असून आज दि. 12/03/2024 रोजी सदर गुन्ह्यातील महीला आरोपी नामे- जयाजुलाल जाधव, वय-28 रा- घर न. 651, सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको, जळगांव. हिस अटक केलेली आहे.सदर आरोपीतांच्या कब्जातून हिसकावुन नेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मो.सा. मिळुन आलेला मुद्देमालखालील प्रमाणे-1) 8,000/- रुपये किंमतीचा एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा A-13 मोबाईल जु.वा.कि.अं.2)25,000/-रुपये किंमतीची एक हिरो कंपनीची पॅशन प्रो मॉडेल असलेली काळ्या रंगाची लाल पट्टे असलेलीमो.सा.क्रमांक-MH-19-AT-7868 अशी असलेली जु.वा.कि.अं.33,000/-एकुण रुपये
सदर गुन्हयाची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो, श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षकसो. श्री. अशोक नखाते, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. संदीप गावीत व मा. पोलीस निरीक्षकश्री. राकेश मानगांवकर, यांनी केलेल्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील पो. हे कॉ सलीम तडवी, पो. ना. जुबेरतडवी, पो. कॉ. अमितकुमार मराठे, पो. कॉ. मिलींद सोनवणे, पो. कॉ. 2093. तुषार पाटील, म.पो. कॉ. 368. वैशालीसादरे, चालक. पो.हे.कॉ.2587. साहेबराव खैरनार यांनी केले असून गुन्हयाचा पुढील तपास ग्रे.पो.उप.निरी.उल्हास च-हाटे, हे करीत आहेत.