भुसावळ (राजमुद्रा)- नुकत्याच सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार भाजपाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) ने जळगांव जिल्हात विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघातून भाकरी फिरवणार असल्याचे कळते.
भारतीय जनता पार्टी ने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचे तिकीट फायनल केलेनंतर आता मा.शरद पवार साहेबांनी ही दोन्ही खडसेंना (सासरा -सुन) डावलत यावेळी मा.आमदार संतोष चौधरी यांना संधी देणार असल्याचे कळते आहे.
मा.आमदार संतोष चौधरी हे भुसावळ सह खान्देशातील बहुचर्चित राजकीय नाव असुन खान्देशातील राजकारण आजही संतोष चौधरी या नावाच्या अवती भोवती फिरत असते ही बाब मा.शरद पवार यांच्या सारख्या पारखी नजरेतून निसटु शकत नाही. या अगोदर ही संतोष चौधरी यांनी भुसावळ ची आमदाकी,व भुसावळ नगरपालिका आपल्या एकहाती ताब्यात घेत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ला बळ देत राष्ट्रवादी जनमानसात नेऊन ठेवली होती. ऐकेकाळी संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी ला सुगीचे दिवस आले होते.
त्यामुळे संतोष चौधरी यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मुळे आता रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलुन आता खडसे X चौधरी असा रंगतदार सामना होणार आहे.
उद्या दुपारपर्यंत पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार संतोष चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.