जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | आय एम ए जळगाव तर्फे कोविड पश्चात उद्भवलेल्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पुढाकार घेत रक्तदान शिबीराचे आयोजन
आयएमए हॉल येथे करून राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस साजरा करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे याच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयएमए जळगाव चे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. अनिल पाटील, डॉ. संजीव भिरूड, डॉ.विलास भोळे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. शिरीष चौधरी, डॉ.राजेश डाबी, डॉ राहूल महाजन, डॉ.संजय बाविस्कर, डॉ.अनिल खडके, डॉ.श्रीराज महाजन, डॉ.अतुल चौधरी, डॉ अतुल पाटील, डॉ.धीरज चौधरी, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.अविनाश भोसले, डॉ.नितीन पाटील, डॉ.जितेंद्र कोळी, डॉ.सुशिल राणे, डॉ.अमित भंगाळे, डॉ.समीर शाह, डॉ.अमेय कोतकर, डॉ. स्वप्निल कोठारी आदी आयएमए सदस्य डॉक्टर उपस्थित होते.
डॉ.चंचल शाह, डॉ.लिना पाटील, डॉ.आम्रपाली काकलीया, डॉ.दर्शना शाह, डॉ.अश्विनी टेणी, डॉ.वृषाली सरोदे, डॉ.विणा महाजन, डॉ.सुवर्णा जोशी, डॉ.विजयश्री मुठे आदी ११ महिला डॉक्टर्स, जेष्ठ नागरिक डॉक्टर्स, विशेषज्ञ डॉक्टर्स, तसेच अति दुर्मिळ रक्तगट असलेल्या डॉक्टरांनीही रक्तदान केले.
आयएमए हॉल येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबीरात ६१ रक्ताचे युनिटस संकलित करण्यात आले. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र यांचे तंत्रज्ञ व कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले. कोविड १९ चे सर्व प्रतिबंधात्मक उपायांचा पालन करून झालेले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ सी जी चौधरी, सचिव डॉ राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ भरत बोरोले, डॉ राहूल मयूर, डॉ दिलीप महाजन, डॉ सचिन देशमुख, डॉ किशोर पाटील आदिंनी परिश्रम घेतले.