राजमुद्रा वृत्तसेवा । जम्मू – काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. काल रात्री उशिरा सुरू झालेल्या जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकी अजूनही सुरु आहे. पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथील हंजन बाला भागात सुरु असलेल्या चकमकीच्यावेळी तीन ते चार दहशतवादी घेरले जाण्याची शक्यता आहे.
चकमकीत क्रॉस फायरिंग दरम्यान एक सैनिक शहीद झाल्याची पुष्टी भारतीय लष्कराने दिली आहे. काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चकमकीच्या वेळी जवानाला गोळ्या लागून जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमी सैनिकाचे निधन झाले. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर दुसऱ्या एका घटनेत जंगलाला मोठी आग लागली आहे.राजौरीच्या कुलदब्बी भागात मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागली आहे. आग आटोक्यात आणल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन केले जाईल. ग्रामस्थांसह आमची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. आग एका बाजूने नियंत्रित केली गेली आहे, अशी माहिती सुंदरबणी वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश वर्मा यांनी दिली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली की, पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात हंजिन गावात सुरक्षादलाकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत होते. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर हे ऑपरेशन सुरु होते. त्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला.
( File Photo )