पाचोरा (राजमुद्रा) :- भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रचार नियोजनासाठी पाचोरा तालुकास्तरीय पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा काल संपन्न झाला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर, लोकसभा निवडणुक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, उमेदवार स्मिताताई वाघ, विधानसभा निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, दिपकदादा माने, कांतीलालभाऊ जैन, रमेशशेठ वाणी, परेशभाऊ पाटील, प्रदीपदादा पाटील, बन्सीलालभाऊ पाटील, सतीशबापू शिंदे, सौ.ललिताताई पाटील, सौ. ज्योतीताई चौधरी, सौ.स्वातीताई पाटील, मुकेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक अश्या ४०० जागांचा टप्पा पार करण्यासाठी एक एक लोकसभा जागा महत्वाची आहे. निर्णयाक बहुमत असेल तरच देशहितासाठी धाडसी निर्णय घेता येतात. राम मंदिर उभारणी, 370 कलम हटवणे यासोबतच देशाच्या पायाभूत सुविधांच्या बाबत जे निर्णय घेण्यात आले ते केवळ बहुतम असल्यामुळे घेता आले. त्यामुळे कुठेही गाफील न राहता येणाऱ्या काळात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आपलं एक मत देशासाठी किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला पटवून द्यावे लागेल. उमेदवार जरी स्मिताताई असल्या तरी आपण प्रत्येक जण उमेदवार आहोत या भावनेतून काम करण्याचे आवाहन यावेळी केल.