मुंबई (राजमुद्रा):- ठरल्याप्रमाणे आज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील,व पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करणं पवार यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मातोश्री गाठत शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला आहे.
भाजपा पक्ष श्रेष्ठींनी तिकीट नाकारल्या नंतर खा. उन्मेष पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. त्या नाराजीनाट्यावर पडदा पडला असुन आज उन्मेष पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे प्रवेश केला असुन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे गणित बदलावणारी घटना आहे.