जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील यांच्या बदलीनंतर आणखी काही अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची सूत्रांनी सांगितले आहे. तर काही अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत यापूर्वीच पाच प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रिक्त पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय लोकांचे लक्ष लागल्याचे बोलले जात आहे.
जि .प चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती झाली असून त्यांनी अद्याप सेवेचा चार्ज घेतला नसून त्यांनी यापूर्वी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. ते सध्या रजेवर असल्याने डॉ. बी एन पाटील यांची बदली होऊन देखील त्यांना जाता येत नाही. तसेच ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी ए बोटे यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांच्या सोबतच महिला व बालविकास अधिकारी आर. आर तडवी यांची देखील पदोन्नतीवर बदली होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, जिल्हा जल संधारण अधिकारी, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांची पदे जिल्हा परिषदेत अनेक दिवांपासून रिक्त आहे. जि . प च्या रिक्त जागांवर अद्यापही नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाही.