भडगांव (राजमुद्रा) : – कजगाव येथील एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना १ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. याबाबत कजगाव येथील एका विरोधात भडगाव पोलिसात पीडितेचे नातेवाईक महिलेच्या फिर्यादी वरून दि.२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 4 एप्रिल बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
कजगाव येथील एका ३९ वर्षीय मुलीवर गावातीलच व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. संशयित आरोपीने दुपारी या मतिमंद मुलीला घरात बोलून अत्याचार केला. हा इसम घरात एकटाच राहतो. पीडितेचा भाऊ व वहिनी हे आरोपीच्या घराजवळून जात असताना पीडित मुलगी आरोपीच्या घरातून रडत व कपडे सावरत बाहेर पडताना दिसली. तिला घरी घेऊन गेल्यावर पिडीतेच्या वहिनीला संशय आल्याने त्यांनी कपडे व अवतार पाहून पीडित मुलीला विश्वासात घेत विचारले असता, तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत संशयित आरोपी विरुध्द भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत करीत आहे.