आज संध्याकाळपर्यंत मुहूर्त ठरणार ,खडसेंचा भाजप प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील गणिते बदलणार
जळगाव (राजमुद्रा) : – आताच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी भाजपला सोडून गेलेले उत्तर महाराष्ट्राचे नेते एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते .परंतु आज पुन्हा सायंकाळ पर्यंत ते आपल्या स्वगृही (भाजपत) परतणार असल्याचे त्यांनी स्वतः माध्यमांना माहिती दिली आहे .
गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा होत होती ,त्यातूनच यासाठी ते दिल्लीला देखील जावून आल्याची अमाहिती होती या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून ते आता अधिक्कृत भाजपात प्रवेश करणार आहे.
राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे हे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे याबाबत अद्याप पर्यंत वेळ निश्चित झालेली नसली तरी आज संध्याकाळपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची वेळ ठरणार आहे. एकनाथ खडसे सोबत रोहिणी खडसे ह्या देखील भाजप प्रवेश करणार काय ? याबाबत मात्र शंका कायम आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे या आगामी काळात मुक्ताई नगर विधानसभा लढवणार असून पुढचे राजकारण सोयीचे जावे म्हणून राष्ट्रवादीतच राहणार की वडिलांसोबत भाजप प्रवेश करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र सून असलेल्या विद्यमान खासदार व भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा मार्ग मात्र सुकर होणार आहे. खडसे परिवारात भाजपमध्ये रक्षा खडसे या एकांकी पडलेल्या होत्या मात्र स्वतः आमदार एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करत असल्याने रक्षा खडसे यांची ताकद आणखी वाढणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी मदत खडसे यांच्या माध्यमातून रक्षा खडसे यांना होणार आहे.
उत्तर महाराष्ट्र मध्ये संपूर्ण राजकीय गणिते खडसे यांच्या भाजप प्रवेशाने बदलणार आहे. यामध्ये खास करून रावेर लोकसभेमध्ये भाजपकडून त्यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्रीय पातळीवरून एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाची सूत्रे हलवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.