(राजमुद्रा जळगाव) जळगाव जिल्ह्याच्या अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या जाहीर आवाहनाला मान देत माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू कलावंतांना एक महिन्याचा किराणा देऊ केला आहे. अ. भा. मराठी नाट्य परिषद अध्यक्षा रोहिणी ताईंनी केलेल्या जाहीर आवाहनाला चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून येत असून जिल्ह्यातील उद्योजक व दानशूर व्यक्ती कलावंतांसाठी पुढे सरसावले असल्याचे दिसून येत आहेत.
कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सध्या हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कलावंतांसाठी मदतीचे आवाहन काल (ता.6) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. अभिजित राऊत यांना निवेदन देताना केले होते. याला दुजोरा देत लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी आज कलावंतांना एका महिन्याच्या किराणा स्वरूपात मदत केली असून ही मदत लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोदजी ढगे यांच्याकडे देऊ केली आहे. याप्रसंगी रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या समवेत मनोज आहुजा, अशोकभाऊ लाडवंजारी, सुनीलभैय्या पाटील, अशोकभाऊ पाटील आदी उपस्थित होते.