जळगाव (राजमुद्रा) :- देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन सर्व सहकारी मंत्री यांच्याकडे मंत्रालयातील तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे, तेव्हा तिजोरी खोलतो, दणदणाट पैसे वाटतो. एखाद्या गावाने निधी मागितला, तर मी नाही म्हणतच नाही कधी, असे धक्कादायक आणि खळबळजनक वक्तव्य जळगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. या वक्तव्यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी भरसभेत मंत्रालयातील पैशांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते जळगावामध्ये बोलत होते.
मंगेश चव्हाणांच्या या गंभीर वक्तव्याची दखल सरकार घेते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तसचे विरोधक सत्ताधारी पक्षाला कशाप्रकारे जाब विचारतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगेश चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे, लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. आपला पैसा अशापद्धतीने वाटला जात असेल तर मंत्रालयातील तिजोरी सुरक्षित नाही, असेही राज्यातील जनतेला वाटू शकते.
विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी भरसभेत हे वक्तव्य करताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि इतर सर्व मंत्र्यांचा
उल्लेख केल्याने हे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. राज्याची तिजोरी अशाप्रकारे हे मंत्री आपल्या मित्रांना खुली करून देतात,
कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत, असा समज जनमानसात पसरण्याची शक्यता आहे.