चाळीसगाव (राजमुद्रा). : – लोकसभा निवडणुक 2024 शांततेने तसेच भयमुक्त वातावरणात होणे करीता चाळीसगांव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करणेकामी मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक यांनी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घातक हत्यारे बाळगुन शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे इसम नामे 1) राहुल आण्णा जाधव रा.चाळीसगांव, 2) शाम उर्फ आण्णा नारायण गवळी रा. चाळीसगांव, 3) हैदरअली आसिफअली सैय्यद रा. चाळीसगांव यांच्या विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे.तर्फे मा. उपविभागीय अधिकारी, चाळीसगांव विभाग, श्री प्रमोद हिले यांचेकडे मुंबई पोलीस कायदा कलम 56 (अ) प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावाचे अनुषंगाने मा. सहा.पोलीस अधिक्षक, श्री अभयसिंह देशमुख यांचे चौकशी अंती रिपोर्टान्वये इसम नामे 1) राहुल आण्णा जाधव यास जळगांव जिल्ह्यातुन एक वर्षे, 2) शाम उर्फ आण्णा नारायण गवळी यास जळगांव जिल्ह्यातुन एक वर्षे, व इसम नामे 3) हैदरअली आसिफअली सैय्यद यास जळगांव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यातुन दोन वर्षे करीता हद्दपार आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी, चाळीसगांव भाग, श्री प्रमोद हिले यांनी पारित केले आहेत.
सदर हद्दपार प्रस्ताव कार्यवाही ही संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच पोहेकॉ/विनोद भोई, पोना/तुकाराम चव्हाण यांनी केली आहे.