जळगाव राजमुद्रा :- शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील ई सेक्टरमधील बंद असलेल्या गुरूकृपा इंडस्ट्रिज या कंपनीचा लोखंडी दरवाजा तोडून ६४ हजार २४२ रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक मोटर चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना बुधवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जीवन नगरमधील रहिवासी असलेले लोकेश प्रकाश पाटील (वय ३८) यांची औद्योगिक वसाहत परिसरात कंपनी असून ई सेक्टरमध्ये गुरूकृपा इंडस्ट्रीज नावाचीदेखील कंपनी आहे. मात्र ही कंपनी सध्या बंद असून त्या ठिकाणी मोटर व इतर साहित्य ठेवलेले होते. दि. १३ एप्रिल ते दि. १७ एप्रिल दरम्यान
कंपनीच्या दरवाजाचे कुलूप तोडून ६४ हजार २४२ रूपये किंमतीच्या ईलेक्ट्रीक मोटर चोरुन नेल्या. दि. १७ एप्रिल रोजी पाटील हे काही साहित्य घेण्यासाठी तेथे गेले असता त्यांना शटर उचकलेले दिसले. त्या वेळी त्यांनी आत पाहणी केली असता कंपनीत चोरी झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या वरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत