चाळीसगाव (मादु्र्णे) राजमुद्रा:-_विद्युत रोहित्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे मांदुर्णे शिवारातील सहा एकरावरील मका गुरुवारी (ता. २) दुपारी सव्वादोनच्या सुमारास जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले.
या घटनेमुळे उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
मांदुर्णे (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी दगडू पाटील यांच्या गट क्रमांक २८२/१, २८२/२ या क्षेत्रातील सहा एकर मक्याचे साडेचार लाखांचे, तर पिकाला पाण्यासाठी लागणारे ठिबक सिंचन सहा एकर तीन लाख, तर दीड लाखाचा चारा, असे सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले. विद्युत रोहित्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागली. मका पिकाला लागलेल्या आगीने थाेड्याच वेळात रौद्ररूप धारण करून शेतकऱ्याचे सहा एकर मका व ठिंबक खाक झाले.
भरपाई मिळण्याची मागणी
तालुक्यात चारा व पाण्याची खुप टंचाई आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करून पिकाला पाणी दिले. मात्र, शेतात पंचनामा करण्यासाठी कुणीही न फिरकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकसानीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. प्रशासनाने पंचनामा करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.