जळगाव(राजमुद्रा) :- वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे.
यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे आदी
एकलव्य संघटनेचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.