जळगाव (राजमुद्रा). : – जिल्हयांतील रामानंदनगर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन व अमळनेर पोलीस स्टेशन
रेकॉर्ड वरील ०३ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायदया अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
१) रामानंदनगर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम अशोक बाळू कोळी वय ३६ रा. साईबाबा मंदिर जवळ समतानगर,
जळगाव ता. जि.जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ०९ गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक
व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा
काळा बाजार करणान्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा
क्रमांक -५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “हातभट्टीवाला” या संज्ञेत प्रस्ताव हा रामानंदनगर पो.स्टे. चे
पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र कुटे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि. ३०/०४/२०२४ रोजी
सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता.
त्यानुसार दि.३०/०५/२०२४ रोजी मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र. दंडप्र /
कावि/ एमपीडीए/१८/२०२४ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. सदर स्थानबंध्द इसमास रामानंदनगर पो.स्टे. चे
पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र कुटे, सहा. पो. निरी. श्री. विठ्ठल पाटील, पोहेकॉ /संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी,
इरफान मलीक, पोना/रेवानंद साळुखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, पोकॉ/ रविंद्र चौधरी, उमेश पवार अशांनी
स्थानबध्द इसमास दि.३१/०५/२०२४ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई
जि. मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.
२) एमआयडीसी पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम भुषण ऊर्फ भासा विजय माळी वय २४ रा. भुई काटयाच्या मागे
तुकाराम वाडी जळगाव ता. जि. जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत..
सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक
व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा
काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा
क्रमांक – ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत प्रस्ताव हा एमआयडीसी
पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक, श्री. बबन आव्हाड यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे
दि. २१/०५/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस
सादर करण्यात आला होता.
त्यानुसार दि.३०/०५/२०२४ रोजी मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/
कावि/ एमपीडीए / २१ / २०२४ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. सदर स्थानबध्द इसमास एमआयडीसी पो.स्टे. चे
पोलीस निरीक्षक, श्री. बबन आव्हाड, पोउनि, दिपक जगदाळे, सफी/अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, किशोर पाटील,
पोकों/छगन तायडे, राहुन रगडे, विशाल कोळी, किरण पाटील अशांनी स्थानबध्द इसमास दि. ३१/०४/२०२४ रोजी
ताब्यात घेतले आहे. सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर जि. कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले
आहे.
३) अमळनेर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख वय २४ रा. पिंपळे रोड
संविधान चौक लाकडी बखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर जि.जळगाव याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत २७
गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक
व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा
काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदाक्रमांक – ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत प्रस्ताव हा अमळनेर
पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक, श्री. विकास देवरे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था. गु.शा. जळगाव येथे
दि.०१/०५/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस
सादर करण्यात आला होता.
त्यानुसार दि.३०/०५/२०२४ रोजी मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र. दंडप्र/
कावि/एमपीडीए/१९/२०२४ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. सदर स्थानबंद इसमास अमळनेर पो.स्टे. चे
पोलीस निरीक्षक, श्री. विकास देवरे, सहा. पो. निरी. श्री. अजित साळवे, पोहेकॉ / किशोर पाटील, पोकों/चरण पाटील, प्रशांत
पाटील, नितीन मनोरे अशांनी स्थानबध्द इसमास दि. ०१/०६/२०२४ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर स्थानबध्द इसम यास
मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि.ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.
वरील स्थानबध्द इसमाचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात
आली होती. तरी सुध्दा त्याचे वर्तनात सुधारणा झाली नसून तो पुन्हा गुन्हे करण्याची सवय सुरुच ठेवली.
वरील एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर,
अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. संदिप गावीत,
उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग, मा. श्री. सुनिल नंदबालकर, उपविभागीय पोलीस अधिकारी,
अमळनेर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तक्कालीन पो. निरी. श्री. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव
व त्यांचे अधिनस्त सफी/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ / जयंत भानुदास चौधरी,
पोहेकॉ / रफिक शेख कालु, पोकॉ/ ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.ढढं