जळगाव (राजमुद्रा) : – मागील दोन टर्मपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. आता येत्या ४ जूनला लोकसभा निकाल लागणार असून भाजप पुन्हा सत्तेत राहणार कि बाहेर जाणार हे स्पष्ट होईल.
मात्र लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे पक्षांतर्गत समन्वय आणि नियोजनाचा अभाव हेदेखिल एक कारण सांगितले जात आहे. त्याचा फटका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही बसण्याची शक्यता असून लोकसभा निकालानंतर बदलाचे संकेत मिळाले आहेत.
गेली ३५ वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेला जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदार संघात यंदा प्रथमच चुरस निर्माण झाली होती. कार्यकत्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपत संघटनात्मक ताकद विखुरल्याने निवडणुकीदरम्यान चर्चेचा मुद्दा ठरला. प्रचाराची रणनिती ठरविताना समन्वयाचा अभाव असल्याचे पक्षातील पदाधिकारीच बोलताना दिसले. त्याचा फायदा विरोधकांना होताना दिसत होता. पक्षांतर्गत चढाओढ, वर्चस्वाची लढाई, नाराजीनाट्य रंगल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपासून दिसले होते. या सर्व घडामोडींची जाणीव झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी धोका लक्षात घेत बदलाचे संकेत दिले.
जिल्हाध्यक्ष अडचणीत
जळगाव लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर व महानगराच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांची गेल्या वर्षी जुलैत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी कार्यकारिणी जाहीर झाली होती. दरम्यान सुरूवातीपासून नवीन कार्यकारिणीत जुन्यांना डावलण्यात आल्याची ओरड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी जुनेव निष्ठावान कार्यकर्ते प्रचारापासून लांब होते. परंतु उमेदवार जाहीर होवूनही कामाला गती येत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले