जळगाव (राजमुद्रा) : – आज दिनांक-01/06/2024 रोजी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास सुरज संजय बारी वय-29 व्यवसाय-
रेल्वे हेल्पर, रा- 660, विठ्ठलपेठ बारीवाडा, जळगांव ता.जि.जळगाव हे भुसावळ येथुन जळगांव येथे बसने
उतरले असता त्यांचे डाव्य पॅन्टच्या खिशातुन एक रेड मी-12 कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल तसेच त्याच
बस मध्ये प्रवास करीत असलेले संतोष लक्ष्मण वानखेडे, वय-43 रा- अनुराग, स्टेट बँक कॉलनी, प्लॉट न.13
ब्लॉक न.2 जळगांव ता.जि.जळगांव. यांचे शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेला सॅमसंग कपंनीचा एम-33, हिरव्या
रंगाचा मोबाईल असे दोन मोबाईल चोरी झाल्याने सुरज संजय बारी वय-29 व्यवसाय- रेल्वे हेल्पर, रा- 660,
विठ्ठलपेठ बारीवाडा, जळगांव ता.जि.जळगाव यांनी, कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेला बाबत जिल्हापेठ
पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन CCTNS भाग 5 गुरन-0164/2024
भा.द.वि.कलम-379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयात गुन्हे शोध पथकातील पो.कॉ.2093.तुषार पाटील, यांना मिळालेल्या गुप्त बातमी मिळाली कि, एक इसम संशयीतरित्या बस स्थानक मध्ये फिरत आहे, सदरची हकीकत त्यांनी पो.हे.कॉ.2534. सलीम तडवी, यांना कळविले वरुन त्यांनी सदरची
माहिती मा. पोलीस निरीक्षक श्री. राकेश मानगांवकर, सांगीतले, त्यांनी लागलीच जळगांव शहरातील बस
स्थानक परिसरात गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. 2534. सलीम तडवी, पो. कॉ. 2093. तुषार पाटील,
पो.कॉ.0224. जयेश मोरे, अश्या सर्वांनी मिळुन बस स्थानक परिसरात सदर संशयीत इसम याचा शोध घेत
असतांना एक संशयीत इसम ऊभा असलेला दिसला, सदर पथकाने त्याचे जवळ जावुन विचारपुस केली
असता तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने, त्याची अंगझडती घेता वरील चोरीस गेलेले दोन मोबाईल
पॅन्टच्या खिशात मिळुन आले, त्यास त्याचे नांव विचारले असता त्याने त्याचे नांव मुजीबुर रहमान मोहम्मद
इस्माईल वय-25 रा- गुलशन नगर, उमर युसूफ मशिद जवळ, मालेगांव जि. नाशिक असे सांगीतले त्याचे
कडेस मिळुन आलेले मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे-
1)15,000/- रुपये किंमतीचा एक रेड मी-12 कंपनीचा, काळ्या रंगाचा मोबाईल, जु.वा.कि.अं.
2)17,000/- रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा, एम-33 हिरव्या रंगाचा मोबाईल, जु.वा.कि.अं.
32,000/- एकुण रुपये
सदर गुन्हयाची कामगिरी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. संदीप गावीत व मा. पोलीस
निरीक्षक श्री. राकेश मानगांवकर, यांनी केलेल्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी
पो.कॉ.2093.तुषार पाटील, पो.कॉ.0224. जयेश मोरे, यांनी केले असून गुन्हयाचा पुढील तपास म.पो.हे.कॉ
2853. पल्लवी मोरे हे करीत आहेत.