मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही बँक अडचणीत नसून बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. केवळ साप-साप म्हणायचे आणि भुई थोपटण्याचा हा राजकीय विरोधकांचा प्रयत्न आहे. राजकीय सुडापोटी व राजकीय नियोजन करून विरोधीपक्ष नेता या नात्याने आणि बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. “कर नाही त्याला डर कशाला” मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. त्यामुळे माझी एकदाच काय पण शंभरवेळा चौकशीला जाण्याची तयारी आहे. असे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात काही प्रसिद्धी माध्यमातून चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध होत आहे. त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतांना बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मुंबई बँकेच्या कथित घोटाळ्या संदर्भात विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी बँकेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी बँकेसंदर्भात केलेल्या आरोप संदर्भात प्रतिउत्तर देऊन बँकेच्या कामकाजाची माहिती दिली.