भुसावळ (राजमुद्रा) : शहरातील सातारा भागातील मुख्य रस्त्यावर २९ मेस माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात येऊन त्यांना शुक्रवारी (ता.३१) सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील चौथ्या संशयितास पोलिसांनी शनिवारी (ता. १) यावल तालुक्यातून अटक केली आहे. (Fourth suspect detained in Bhusawal firing case)
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तसेच भुसावळ उपविभागाचे तीन पथके असे एकूण चार पथकांची नेमणूक वरिष्ठांच्या आदेशावरून करण्यात आली आहे. सदरील पथक गुन्ह्यातील फरारी संशयितांचा शोध घेत.
असताना २९ मेस गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तूल यावल तालुक्यातील अकलूद गावामधील किरण कोळी या व्यक्तीकडे ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने मोर्चा त्या दिशेने वळवीत सापळा रचून शनिवारी (ता.१) अकलूद गावामधून संशयित किरण कोळी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तूल पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे.