जळगाव (राजमुद्रा) : – जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाच्या गळा चिरून खुन केल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घे तपासून केला आहे.
मिळाले माहिती अशी की, जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी (वय-४५) हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांच्या मृत्यू ते मिळून आला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी २ मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित ह्या घटनास्थळी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे.