चाळीसगाव (राजमुद्रा) : – दि.01/06/2024 रोजी इसम नामे प्रल्हाद शंकर पवार वय 40 वर्ष धंदा भाजीपाला विक्री रा. सुर्वणाताई नगर, चाळीसगाव ता. चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती कि दि.01/06/2024 रोजी सकाळी 11.00 वा.ते दुपारी 02.45 वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहरातील सुर्वणाताई नगर येथील त्याचे राहते घराचे बंद दरवाजा उघडुन कोणीतरी अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करुन घरातील पत्र्याची पेटी व तिच्यातील 20 हजार रोख रक्कम चोरुन नेले आहेत त्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 237 /2024 भादवि कलम 380,454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर तक्रारदार हा अत्यंत गरीब घरातील असुन त्याने थोड थोड करुन सदरचे पैसे जमा केले होते.
सदर गुन्ह्याचा तपासबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक, श्री अभयसिंह देशमुख यांनी सदर गुन्हा उघडकीस आनणे बाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या त्यानुसार सपोनि सागर् ढिकले यांनी, पोउपनि संदीप घुले, पोहेकाँ अजय पाटील, पोना दिपक पाटील पोना तुकाराम चव्हाण,पो.काँ अमोल भोसले, पो. काँ नंदकुमार महाजन, पो. काँ मोहन सुर्यवंशी, यांचे पथक तयार करुन तपासकामी रवाना केले सदर पथकांने गोपनीय माहीतीच्या आधार आरोपी नामे 1) संजय सुभाष मरसाळे वय 20 रा सुवर्णाताईनगर चाळीसगाव 2) ऋतिक किशोर जाधव वय 21 रा सुवर्णाताईनगर चाळीसगाव 3) अविनाश लक्ष्मण पाखले वय 21 वर्षे सुवर्णाताईनगर चाळीसगाव जि. जळगाव यांना अटक करुन त्यांच्याकडुन गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम जप्त केलेले आहे. मा. न्यायालयाकडुन आरोर्षीचा 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यातआला असुन, सदर गुन्ह्याचा तपास पोहेकाँ अजय पाटील व पथक करित आहे.