चाळीसगाव तालुक्यातील ५ हजार तरुणांनी केली रेकॉर्डब्रेक नोंदणी…
चाळीसगाव (राजमुद्रा) :- शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी व निर्व्यसनी, स्वाभिमानी युवा पिढी घडविण्यासाठी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षी रायगड मोहीम राबविली जाते. सदर ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरुणाईला उधाण आले आहे. तालुक्यातून जवळपास ५ हजार तरुणांनी सदर मोहिमेसाठी नोंदणी करत एक नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे.
आज दि.३ रोजी रायगड मोहिमेचे अंतिम ओळखपत्र घेण्यासाठी हजारो तरुणांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात गर्दी केली होती.
शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी स्वतः नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहत तरूणाईशी संवाद साधत नियोजनात सहभाग घेतला.
जास्तीत जास्त तरुणांच्या कपाळी रायगडाची माती लावण्याचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा संकल्प…
चाळीसगाव तालुक्यातील किमान 3 हजार तरुणांना यावर्षी रायगड दर्शन घडविण्याचे नियोजन आहे मात्र नोंदणीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जास्तीत जास्त तरुणांच्या कपाळी पवित्र रायगडाची माती लावण्याचा संकल्प केल्याचा मनोदय रायगड मोहिमेचे संकल्पक आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.