पाचोरा (राजमुद्रा) : –सोमवार दि ३ जुन २०२४ रोजी सकाळी ११ वा शहराचे मध्यवर्ती ठिकाण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहरातील पुरोगामी परिवर्तनवादी व प्रागतिक विचारांच्या नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या व्दारा संशोधन व पाठ्यक्रमात अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणांच्या नावाखाली असमानतेला प्रोत्साहन देणारी मानवात भेदाभेद करणारी स्त्रीयांना अपमानीत करणारी मनुस्मृती व मनाचे श्लोकांचे समावेश करण्यात येत असुन येऊ पाहणारा नवीन सांस्कृतिक दहशतवादा विरूद्ध प्रागतिक विचार ठेवणारे पुरोगामी नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येऊन मनुस्मृती दहन करण्यात आले यावेळी शहरातील विविध पक्ष संघटना सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी सेवा संघ, सत्यशोधक समाज, समता परिषद, बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी, क्षत्रिय ग्रुप,समता सैनिक दल, महापुरुष सन्मान समिती,तसेच सर्व सन्मानिय पत्रकार बांधव,खलिलदादा देशमुख, पप्पू आण्णा राजपूत ,सुनिल शिंदे, विकास पाटील, डि एम मोतीराय,संगिता ताई साळुंखे,डि एन भाऊसाहेब पाटील, प्रविण ब्राह्मणे, अँड अंकुश कटारे, अँड कैलास सोनवणे, अँड अभय पाटील, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील,बंडू मोरे,जिभाऊ पाटील, गणेश पाटील, सुनिल पाटील, निलेश मराठे,आनंद नवगिरे, रोहीदास बागुल, संतोष मोरे, बबलू आदीवाल ,खंडु सोनवणे,अशोक मोरे, देविदास सावळे,दीपक मुळे, अरविंद जगताप, सुधाकर मेढे, प्रकाश विसपुते,राजु पाटील, सुनिल महाजन, कन्हैया देवरे, धर्मसिंग पाटील, राहुल बोरसे,दीपक महाजन, रोहित ब्राह्मणे,लतिफ खाटीक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक विकास पाटील, पप्पू आण्णा राजपूत, खलिलदादा देशमुख, डि एन भाऊसाहेब पाटील,सुनिल शिंदे अँड.अंकुश कटारे यांनी केले.