जळगाव (राजमुद्रा) : – निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रांमधील बॅटरी ही ९० टक्के चार्ज असल्याची बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम मशिनवरच आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे रावेरची मतमोजणी थांबविण्यात आली आहे.