जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी नंदुरबार येथील संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच कार्यादेश देऊन कामाला सुरुवात होणार आहे. ऍनिमल वेल्फेअर बोर्डाकडे करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने कडक धोरण राबविण्याचे ठरवले आहे.
दरम्यान संस्थेकडून करण्यात येणाऱ्या निर्बीजीकरणाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी समितीची घोषणा केली जाणार आहे. मनपाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नंदुरबार येथील संस्थेला जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. यासाठी येत्या स्थायी समिती सभेत प्रस्ताव ठेवले जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर कार्यादेश दिले जाणार आहे. संस्थेकडून निर्बीजीकरणाचे काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात आरोग्य अधिकारी, पशु वैद्यकीय डॉक्टर व एनजिओ सदस्यांचा समावेश राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.