मुंबई राजमुद्रा | प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत आज प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी राज्यभरात केलेल्या पक्षीय संघटनात्मक कार्याचा कार्य अहवाल भाजप पक्षाचे उपस्थितीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तसेच पक्ष आदेश मानून गेल्या अनेक दिवसापासून पक्ष संघटना बळकतीसाठी महा विजय अभियानाच्या माध्यमातून महामंत्री विजय चौधरी यांनी राज्यभरात भाजपाला अधिक फायदे होण्यासाठी समर्पण केले आहे प्रकाशित झालेल्या कार्य अहवालाबाबत भाजपा नेत्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेन्द्रजी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन महामंत्री विजय चौधरी यांनी स्वागत केले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवप्रकाशजी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,माधवीताई नाईक, संजय केनेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.