मुंबई राजमुद्रा | लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने देखील इंडिया आघाडी मधील पक्ष कामाला लागले आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सयुक्तरीत्या आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा इरादा उद्धव ठाकरे यांनी दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला थांबवायचा असेल तर एकत्रित येऊन निवडणुका लढाव्या लागतील असा आशावाद देखील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपाचा विजय रथ रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे विजयी गोडधोड सातत्यपूर्ण चालू राहावे म्हणून इंडिया आघाडीच्या त्यांच्या वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहे. या संदर्भात बैठकांची प्राथमिक फेरी देखील पार पडली आहे नुकतीच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली आहे यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घेऊन तसेच इतर घटक पक्षांना सोबत घेणार आहे व पुढील राज्याच्या विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहे इतर राज्यात देखील विधानसभा निवडणुका असून त्यासाठी देखील आपली ताकद पणाला लावणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्रातील मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा उत्साह गगनाला भिडला आहे त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील महाविकास आघाडी पर्यटन राबवून अधिक मजबुतीकडे लक्ष दिले जाईल असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे यासाठी सर्वांचीच मदत येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
संविधान बदलण्याचा नरेटिव्ह
संविधान बदलण्याचा नकारात्मक प्रचार भाजपपासूनच सुरू झाला. यामुळे त्यांनीच संविधानाबाबत नरेटिव्ह सेट केला. अच्छे दिनाच्या नरेटिव्हच काय झालं ? पंधरा लाखाचं काय झालं ? 2014 पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटीव्ह कुणी सेट केला. असा प्रति सवाल करीत महायुती व राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना कोणाची ?
शिवसेना कोणाची या मुद्द्याकडे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केला आहे सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपली आहे, आम्ही निकालाची अपेक्षा करतो पण जनतेच्या न्यायालयात काय झालं हे जगाने पाहिलं असा टोला लघवी सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.