मुंबई राजमुद्रा | मुंबईत नुकतीच महाविकास आघाडीच्या लोकसभेत मिळालेल्या यशानंतर प्रथमच संयुक्तरित्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये माध्यमांनी विचारलेल्या सोडून गेलेल्यांना परत घेणार का ? या बाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर देखील टीका केली आहे.” मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो.. 23 जानेवारी रोजी नाशिक मध्ये म्हटलं होतं की, भाजप मुक्त राम पाहिजे.. अयोध्येत आणि नाशिक मध्ये भाजप मुक्त राम झाला आहे.. जिथे जिथे राम आहे.. तिथे भाजपाचा पराभव झालाय ” भाजप मुक्त राम झाला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये पुढील प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला, जे लोक सोडून गेले त्यांना पुन्हा घेणार का ? यावर उद्धव ठाकरे यांनी अजिबात नाही असे उत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीच्या संयुक्त रित्या आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदारांवर भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी करीत असल्याचं सांगितले आहे. नव्या दमानं पक्षाची रणनीती आखली जाईल असे देखील त्यांनी सांगितले.