जळगाव राजमुद्रा | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला काही प्रमाणात यश तर काही प्रमाणात अपयश आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीमध्ये भाजपाचा मतांचा आकडा कमी झाल्याचा बघायला मिळाले, भाजपने नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असा दावा केला आहे. त्याच अनुषंगाने जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी जळगाव शहराच्या विकास कामांसाठी व रस्त्यांसाठी 300 कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
अंतर्गत वाद
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी 25 कोटी निधी दिला होता यादरम्यान 25 कोटीच्या निधीमधून विकासाची कामे हाती घेण्यात आले होते मात्र यामध्ये अंतर्गत राजकारण तसेच गटबाजीचा फटका देखील विकास कामांना बसला होता अखेर कसाबसा हा निधी मनपाकडून कामांवर खर्च करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता निधी
यानंतर १०० कोटी निधी आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी दिला यामधून रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. १०० कोटी निधीच्या ४२ कोटी या रकमेतून शहरात सध्या रस्त्याची काम सुरू आहे. मात्र हा निधी पुरेसा नसून शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेज गटार तसेच अमृत योजनेच्या कामाच्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे यामुळे संपूर्ण शहरात काँक्रिटीकरण करण्यासाठी पाहिजे तो निधी नसल्याने विकास कामांना अडथळा निर्माण झाल्याचे डॉ अश्विन सोनवणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना नमूद केले आहे.
विधानसभा, महापालिका निवडणुकीचे पडघम
चार महिन्यावर विधानसभा निवडणुकीचा पडघम वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात विकास कामांसाठी 300 कोटीचा निधी दिल्यास आगामी निवडणुकांमध्ये काम केल्याने चांगले परिणाम निवडणुकीमध्ये येऊ शकतात यामुळे डॉ.अश्विन सोनवणे यांनी शहराच्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे विधानसभा निवडणुका पार पडतात महापालिका निवडणूक यांना सामोरे जावे लागणार आहे यामुळे शहराच्या जनतेला दिलासा देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन विकास कामांसाठी निधी द्यावा अशी मागणी डॉ.अश्विन सोनवणे यांनी केली आहे