मुंबई राजमुद्रा | भारतीय जीवन बीमा निगम देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे शेअर मार्केटमध्ये अग्रस्थानी असलेल्या कंपनीने आपली संपत्ती विकण्याचा निर्णय जाहीर केल्याचे समोर आला आहे एलआयसी मोठ्या शहरांमधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पन्नास ते साठ हजार कोटी रुपयांच्या संपत्ती विकणार असल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये एलआयसी स्लॉट जमीन अशा विविध प्रॉपर्टी ज्यातून कोट्यावधीचा पैसा उभा राहील अशा मालमत्ता एलआयसी विकणार आहे एलआयसीच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये कमर्शियल बिल्डिंग आहे त्यामध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेस मध्ये जीवन भारती बिल्डिंग कोलकत्ता मधील चितरंजन एवेन्यू मध्ये असणारी एलआयसी बिल्डिंग मुंबईमधील प्राईम लोकेशन वर असणाऱ्या बिल्डिंग आदींची विक्री एलआयसी करणार आहे.
उत्तराखंड मधील प्रसिद्ध हिल स्टेशन मसूरी मधील मॉल रोडवर असणारी एसबीआय बिल्डिंग एलआयसी ची असून त्याची देखील विक्री करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कारणामुळे होणार विक्री
2024 च्या आर्थिक वर्षांमध्ये एलआयसी ला 40 676 कोटी रुपये नफा होत होता मात्र मागील वर्षी हाच नफा कमी झाल्याचे दिसून आला मागील वर्षाच्या नफ्यात 36 397 कोटी इतका नफा झाला एलआयसी आपली संपत्ती विकल्यानंतर कंपनीचा नफा वाढवणार आहे विक्रीनंतर नवीन मालकाला जागेचा पुनर्विकास करणे तसेच अद्यावत पद्धतीने इमारती बांधणे अशी विकासात्मक कामे केली जाणार आहे या प्रक्रियेनंतर नवीन कंपनी बनवता येणार आहे देशात अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी एलआयसीच्या प्रॉपर्टी आहेत मात्र त्या विकण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन काही बाबीत सुधारणा करावे लागणार आहे.
एलआयसीचा मोठा प्लॅन
एलआयसी कडे तुलनात्मक 51 लाख कोटींची संपत्ती आहे त्यामध्ये महत्वपूर्ण ठिकाणावर व मोठ्या शहरांमध्ये असलेल्या इमारतींच्या किंमती आताच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे रेडीरेकर नुसार समजत आहे. एलआयसीच्या नवीन प्रॉपर्टी चे मूल्यअंकल करण्याची तयारी एलआयसी ने केली आहे. यामुळे व्यवसायिक प्रॉपर्टी म्हणून विक्री केल्यानंतर एलआयसी मोठा प्लॅन आखण्याच्या तयारीत आहे.