जळगाव राजमुद्रा | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अँड उज्वल निकम निवडणुकीच्या मैदानात उतरले होते भाजपने त्यांना यासाठी विशेष रित्या उमेदवारी देऊन राजकीय एन्ट्री केली होती. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड या विजय झाल्याने निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे मात्र पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय क्षेत्रात पुन्हा एकदा उज्वल निकम यांची झालेली नियुक्ती देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल लागला यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं यामध्ये भाजप चे मताधिक्य घटकांना राज्यभरात दिसून आले यामध्ये मुंबई उत्तर मध्य मध्ये उज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध ऐतिहासिक निवडणूक पार पडले यामध्ये वर्षा गायकवाड यांना शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने यश प्राप्ती झाल्याचं बोलले जात आहे. मुंबई हल्ल्यात कायदेशीर रित्या सरकार पक्षाकडून बाजू मांडणारे उज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच भाजपला झालेल्या पराभवाचा मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. विशेष सरकारी वकील असलेले उज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबईमध्ये लोकसभेची बाजी मारणार असे एकंदरीत चित्र होते मात्र राजकीय विश्लेषकांचे अंदाज देखील या जागेवर फोल ठरले आहे. प्रभावाचे चिंतन म्हणून भाजपकडून बैठकांचा सपाटा लावण्यात आलेला आहे पराभव नेमका कोणत्या कारणामुळे झाला ? याबाबत प्रत्येक राज्यात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे.
लोकसभा च्या निकालानंतर अवघ्या बारा दिवसांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांना राज्य शासनाच्या वतीने पुन्हा एकदा फेरनियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीचे राजकीय पडसाद नेमका कशा पद्धतीने म्हणतात हे पाहणं देखील महत्त्वाचे करणार आहे. उज्वल निकम यांनी राज्याच्या महत्त्वपूर्ण घटनांमध्ये कायदेशीर बाजू मांडली आहे. यामध्ये मुंबई बॉम्बस्फोट हल्ला तसेच 26 /11 रोजी झालेल्या ताज हॉटेल वर दहशतवादी हल्ला अशा अनेक प्रकरणांमध्ये विधीतज्ञ म्हणून उज्वल निकम यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.