जळगाव राजमुद्रा | चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे 80 ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाधित ग्रामस्थांना उपचारार्थ चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच अडावद येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. काहीं ग्रामस्थांची प्रकृती चिंताजनक असून ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार देण्यात येत आहे.
दर आठवड्याला चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजार भरतो या बाजारात विविध वस्तू विक्री करण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी अनेक विक्रेते तालुका स्तरातून तसेच जिल्हाभरातून येत असतात ग्रामीण भागात असल्याने बाजारात येणारी गावाकडची अनेक ग्रामस्थ बाजारात आल्याच्या निमित्ताने खाद्यपदार्थ खरेदी करत असतात अशाच एका पाणीपुरी स्टॉल वर पाणीपुरी खाल्ल्यानंतर एकूण 80 ग्रामस्थांना विषबाधा झाला आहे.
याप्रकरणी अद्याप पर्यंत कुठल्याही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र सदर प्रकाराची चौकशी केली जाते का ? तसेच विक्रेता असलेल्या पाणीपुरी स्टॉल धारकावर नेमकी काय ? कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अन्न औषध विभागाचे झोपेचे सोंग
जिल्हाभरात अण्णा औषध प्रशासनाच्या पाहिजे त्या कारवाई बघायला मिळत नाही यामुळे खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे मात्र यासंबंधी कुठल्याही कारवाई होत नसल्याने भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांची हिम्मत वाढत चालली आहे. अन्न औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांचा अभाव तसेच प्रभारी कारभार यामुळे जळगाव जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभाग वाऱ्यावर आहे का ? असं सवाल उपस्थित केला जात आहे.