जळगाव राजमुद्रा | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांचा कार्यकर्ता पाय धुतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये ओबीसी कार्यकर्त्याकडून चुकीची वागणूक देत नाना पटेल यांनी चिखलातून चालून आल्यानंतर कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले हा प्रकार निषेधार्थ असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरातील टॉवर चौकात भाजपकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा,केतकी पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखा वर्मा, डॉ. राधेश्यामज चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, सरोजा पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखा कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, आघाडी मोर्चाचे भारती सोनवणे, महेश पाटील आधी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
तर प्रदेश जिल्हा व मंडळ पदाधिकारी,महिला मोर्चा व युवा मोर्चा जिल्हा व मंडळ जिल्हा व मंडळ मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.